विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

शिक्षणाचे महत्त्व' आणि 'ज्ञानाचे पावित्र्य' हरवलेला असा सध्याचा काळ आपण सारेच अनुभवत आहोत. 
वास्तविक पाहता 'भारत' या शब्दाचा अर्थच प्रकाशात रत असलेला,
ज्ञानात रत असलेला असा होतो. स्वतःला उजळायचं असेल तर मुळांपर्यंत जावं लागतं,
थोडं स्वतःला हलवावं लागतं; म्हणजे मग पुन्हा एकदा मूळं सक्षम होतात आणि झाडामध्ये आकाशाकडे झेपावण्याची शक्यता निर्माण होते.
ही शक्यता आजमावून पाहण्यासाठी तुम्ही - आम्ही मिळून साजरा करूयात ज्ञानाचा उत्सव !
ज्याला नसेल बंधन भाषांचं, विषयांचं पण मर्यादा असेल सभ्यतेची!
आपल्या 'ज्ञानोत्सव' संकेतस्थळावर सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.